आयटीआय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील वेल्डर चा प्रशिक्षणार्थी अशांत इंदल पवार यांचे सेंटर रेल्वे मुंबई येथे निवड
शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील अशांत इंदल जाधवर ट्रेड वेल्डर या प्रशिक्षणात याने सन 2018- 19 मध्ये वेल्डर या व्यवसायात प्रवेश घेतला होता.
अशांत इंदल पवार हा मु.शिंगोडा .ता.किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून वसतिगृहात राहून एक वर्षाचा वेल्डर हा व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केला. सेंटर रेल्वे मुंबई येथे आज दिनांक 9/8/2021 रोजी सेंटर रेल्वे कल्याण येथे रुजुवात म्हणजे जॉइनिंग झालेला आहे
कोरोणाच्या काळात रेल्वेमध्ये रोजगार मिळाल्याने त्यांच्या खेडेगावात आनंदाचा वातावरण आहे . तसेच अशांत इंदल पवार हा वेल्डर ट्रेड करून रेल्वे रोजगार मिळाल्याने तो स्वतः आनंदित आहे. त्याच्या या रोजगारामध्ये त्याचे व्यवसाय निदेशक श्री शरद आसोले सर यांचा खारीचा वाटा आहे. तसेच संस्थांमध्ये रोजगारासाठी तळमळीने काम करणाऱ्या संस्थेचे प्राचार्य श्री विनोद नागरे साहेब यांच्या सहकार्याने सेंटर रेल्वे मुंबई मध्ये रोजगार मिळाल्याने याचा सदर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.
अशांत हा त्याच्या निवडीचे श्रेय त्याची आई वडील तसेच त्याचे वर्गशिक्षक श्री .शरद आसोले सर आणि संस्थेचे प्राचार्य श्री विनोद नागोरे साहेब यांना देत आहे.तसेच श्री महेश कुमार सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी अशांत जाधव तसेच त्याचे प्रशिक्षक , यांना अभिनंदनसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
नमस्कार महाराष्ट्रातील तमाम, आयटीआय प्राचार्य तथा आयटीआय शिल्पनिदेशक , आपणास कळवू इच्छितो की, ही वेबसाईट आयटीआय अपडेट्स बाबत काम करत असून आपल्या संस्थेतील यशोगाथा, आणि संस्थेतील नवनवीन उपक्रम याबाबत माहिती या वेबसाईटवर माहिती पाठवण्यासाठी खालील मेल आयडी वर मेल करावा. Mail id:- contactnkrathod@gmail.co
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod



0 Comments